एआयचा धोका वाढला 80 हजार लोक झाले बेरोजगार, 2030 पर्यंत 1.8 कोटी नोकऱ्या जाणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ ऑगस्ट ।। जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) ने नोकऱ्यांचा धोका वाढवला आहे. टीसीएसने 12 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू दिल्यानंतर आता एआयमुळे पुढील पाच वर्षांत तब्बल 1.8 कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. त्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतील, अशी भीती वर्तवली जात आहे. आयटी आणि टेक सेक्टरसुद्धा नोकऱ्यांसाठी सुरक्षित राहिले नाही. जगभरात या वर्षात 80 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. एफवायआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, मेटासह एकूण 171 कंपन्यांनी आतापर्यंत 80,250 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. इंटेलने अवघ्या तीन महिन्यांत 27 हजार लोकांना कामावरून काढून टाकले आहे. मायक्रोसॉफ्टने 15 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मेटानेसुद्धा आतापर्यंत 3 हजार 600 कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *