महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) नंबर बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. आता १ ऑगस्टपासून यूएएन नंबरसाठी आधार कार्डवरुन फेस ऑथेंटिकेशन करणे अनिवार्य आहे. हे काम तुम्ही उमंग अॅपद्वारे करु शकतात. दरम्यान, यामुळे कर्मचाऱ्यांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
आता ज्या कर्मचाऱ्यांना मोबाईल नंबर आणि आधार नंबर लिंक नाही आहे त्यांना अडचणी येणार आहेत. तसेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत त्यांनाही फेस ऑथेंटिकेशनमध्ये अनेक अडचणी येतात. यामुळे त्यांचा यूएएन नंबर बनवण्यात अडचणी येऊ शकतात.
UAN बनवण्यासाठी उशिर झाला तर पीएफ खात्याच येणार अडचणी
जर तुमचा यूएएन नंबर नसेल तर तुम्ही पीएफ अकांउंटदेखील अॅक्टिव्ह करु शकत नाही. यामुळे पीएफ खात्यात पैसे जमा होणार नाहीत. दरम्यान, ज्यांचे आधीपासूनच ईपीएफओ रजिस्टर्ड आहे त्यांना काहीच अडचणी येणार नाहीत.
कोणाला येणार अडचणी?
या नवीन नियमांमुळे त्या कर्मचाऱ्यांना अडचणी येणार आहेत ज्यांचे आधार कार्ड लिंक नाही आहे. याचसोबत फोनचा कॅमेरादेखील चांगला नाहीये.याचसोबत स्टाफ कंपन्या, कॉन्ट्रॅक्ट बेस्ड कर्मचाऱ्यांना अडचणी येणार आहे.
उमंग अॅपवरुन करता येणार फेस ऑथेंटिकेशन
उमंग अॅपवरुन तुम्ही फेस ऑथेंटिकेशन करु शकतात. तुम्हाला यावर अनेक सुविधा मिळतील. यामध्ये नवीन कर्मचारी फेस ऑथेंटिकेशन करुन यूएएन नंबर तयार करु शकतात.यासाठी तुम्हाला अॅपवर जायचे आहे. त्यानंतर यूएएन नंबर अॅक्टिव्हेटवर क्लिक करायचे आहे. यानंतर ऑथेंटिकेशन करता येणार आहे.