राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये ३ दिवस दमदार पावसाचा इशारा : 3 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट घोषित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून हवामान विभागाने आज 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे आज या भागातील लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. (maharashtra weather news imd 13 august heavy rain alert in vidarbha and Konkan rain in mumbai and pune )

कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आला अलर्ट?
हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळमध्ये 13 आणि 14 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्येही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

मुंबई आणि पुण्यात कसं असेल वातावरण?
मुंबई आणि उपनगरांमध्ये 13 ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असणार आहे. तर पुण्यात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
गेल्या २४ तासांत, अंदमान आणि निकोबार बेटे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. उत्तर हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि किनारी आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. झारखंड आणि उत्तर मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *