महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। ICICI बँकेने खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने खातेधारकांसाठी किमान शिल्लक मर्यादा वाढवली होती. मात्र, आता ती कमी करण्यात आली आहे. याबाबत बँकेकडून माहिती देण्यात आली आहे. आता बचत खात्याच्या किमान खाते शिल्लक (एमएबी) चे नियम पुन्हा बदलण्यात आले आहेत. ग्राहकांना दिलासा देत ही मर्यादा महानगर आणि शहरी भागात ५०,००० रुपयांवरून फक्त १५,००० रुपये करण्यात आली आहे.
एकीकडे महानगर आणि शहरी भागात बचत खात्यातील किमान मासिक सरासरी शिल्लकची (MAB) मर्यादा बदलण्यात आली आहे. आता अर्ध-शहरी भागात ती 25000 रुपयांवरून 7,500 रुपये आणि ग्रामीण भागात 10000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आली आहे. ग्राहकांनी खात्यात निश्चित मर्यादेपेक्षा कमी शिल्लक ठेवली तर त्यांना दंड भरावा लागेल, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.