महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑगस्ट ।। जगाचा अंत केव्हा आणि कसा होणार यावर भाष्य करणारे अनेक सिद्धांत, अनेक भाकितं आजवर मांडण्यात आली. अनेकदा या सिद्धांतांना अध्यात्मिक जोड होती, तर कुठं वैज्ञानिकांनी व्यक्त केलेल्या भीतीमुळंही हे सिद्धांत विशेष लक्ष वेधून गेले. ज्या गोष्टीची उत्पत्ती होते तिचा ऱ्हासही अटळ आहे हे मुळातच निसर्गाचं सूत्र असल्या कारणानं जीवसृष्टीचाही आज ना उद्या ऱ्हास होणार ही बाब अनेकांसाठीच स्वीकारार्ह आहे. त्यातच सध्या मात्र एका अशा इशाऱ्यानं सारं जग संकटाच्या अशा उंबरठ्यावर उभं आहे जिथून परतणंही जवळपास अशक्य.
महात्सुनामीचं संकट….
हे आहे महात्सुनामीचं संकट. जगातील आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिका या देशाला या संकटाचा सर्वाधिक धोता असून, अमेरिकेनजीकच असणाऱ्या पॅसिफिक महासागरामध्ये ही Mega Tsunami येणार असल्याचा इशारा वैज्ञानिकांनाही हादरवून गेला आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार कॅस्केडिया सबजक्शन झोनमध्ये (CSZ) एक भीषण भूकंप येणार असून, या अतिप्रचंड तीव्रतेच्या भूकंपानं समुद्रात तब्बल 1000 फूट उंचीच्या लाटा उसणाऱय असून, अमेरिकेचा बहुतांश भाग 6.5 फूट इतक्या पाण्यात जलसमाधीस्त होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
संकटाची शक्यता 15 टक्के; मात्र…
वर्जिनियातील संशोधकांच्या मते पुढील 50 वर्षांमध्ये 8 रिश्टर स्केलहून अधिक तीव्रतेचा भूकंप येण्याची 15 टक्के शक्यता असून, या भूकंपानंतर येणाऱ्या महात्सुनामीमुळं अमेरिकेच्या पश्चिमी किनारपट्टी भागात राहणाऱ्या कैक नागरिकांसाठी मोठं संकट प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं जात आहे.
अमेरिकेतील कॅस्केडिया सबडक्शन झोन सर्वाधिक संवेदनशील भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक असून, शतकांपासून सागरी जुआनची फूफा प्लेट उत्तरी अमेरिकेच्या थराच्या खाली सातत्यानं जात असल्यामुळं टेक्टोनिक तणाव वाढू लागला आहे. ही कारणं भविष्याच्या दृष्टीनं दर दिवशी एका नव्या संकटाला आमंत्रण देत आहेत.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, इथं इसवी सन 1700 मध्ये अखेरचा महाभूकंप आला असून, त्याचे परिणाम थेट जपानपर्यंत जाणवले होते. दरम्यान आता जर असंच संकट ओढावलं तर समुद्रात 1000 फूट इतक्या उंचीच्या अजस्त्र लाटा उलळणार असून, त्यामुळं सिएट, पोर्टलँड, कॅलिफोर्निया अशा शहरांचा बहुतांश भाग जलमय होऊ शकतो. मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते, याशिवाय जमीन खचण्याचं प्रमाण आणखी वाढू शकतं.
वर्जीनिया टेक के रिसर्चच्या दाव्यानुसार दक्षिणी वॉशिंग्टन, उत्तरी ऑरेगन, उत्तरी कॅलिफोर्निया यांना प्रामुख्यानं या महात्सुनामीचा मोठा धोका असून, अलास्का आणि हवाई ही क्षेत्रसुद्धा यामुळं प्रभाविक होऊ शकतात. अध्ययनातून समोर येत असणाऱ्या आकडेवारीनुसार या महाभयंकर संकटात 30,000 हून अधिक मृत्यू आणि 81 अब्ज डॉलरहून अधिकचं नुकसान होणार असल्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे.