Trump Tariff: फक्त 6 महिने अन् मग… टॅरिफचा फुसका बार, मिस्टर प्रेझीडेन्टचा डाव फसला ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। रशियासोबत युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेने भारतावर टॅरिफ हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करून युक्रेन युद्धात आर्थिक मदत पुरवल्याचा हवाला देत मनमानी 50 टक्के टॅरिफ लादला आहे, जो दोन टप्प्यात लागू होईल. पहिला टप्पा 7 ऑगस्टपासून लागू झाला असून पुढील टॅरिफ 27 ऑगस्ट रोजी लागू होतील. ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफची भीती निर्माण केली आहे पण, ही भीती भारताविरुद्ध काम करणार नाही.

सहा महिन्यात ट्रम्प टॅरिफचा धुव्वा उडेल
S&P ग्लोबल रेटिंग्जने भारताचे क्रेडिट रेटिंग वाढवून आधीच हे सूचित केले आणि टॅरिफचा भारतावर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होणार नाही असे म्हटले आहे. याशिवाय भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार किंवा CEA व्ही. अनंत नागेश्वरन यांनीही टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती धुडकावून लागली. त्यांनी म्हटले की अमेरिकेने भारतीय निर्यातीवर लादलेल्या शुल्काचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. सहा महिन्यांत परिस्थिती सामान्य होईल असे त्यांना वाटते.

व्ही. अनंत नागेश्वरन म्हणतात की अमेरिकेच्या उच्च शुल्काचा भारतीय निर्यातीवरील आर्थिक परिणाम एक किंवा दोन तिमाहीत कमी होईल. मात्र देशाला दीर्घकालीन आव्हानांसाठी तयार राहण्याचेही आवाहन केले आणि खाजगी क्षेत्राला धोरणात्मक दृष्टिकोनाने काम करण्याचे सांगितले. नागेश्वरन म्हणाले, ‘मला विश्वास आहे की सध्याची परिस्थिती एक किंवा दोन तिमाहीत सुधारेल. मला वाटत नाही की त्याचा भारतावर दीर्घकाळात कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होईल. पण सध्या नक्कीच काही परिणाम होईल.’

अमेरिकेने भारतीय आयातीवर 50% टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, असे CEA ने म्हटले. तसेच भारताच्या जीडीपी वाढीवर या करचा काय परिणाम होईल याचे मूल्यांकन करणे अद्याप घाईचे आहे. अमेरिकेत सध्या भारतीय वस्तूंवर 25% दराने परस्पर टॅरिफ आकारले जाते तर, 27 ऑगस्टपासून हा कर 50% पर्यंत वाढेल. रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी रशियाकडून तेल आणि ऊर्जा आयात केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% कर लादला गेला आहे.

मजबूत आहे भारताची अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल CEA पुढे म्हणाले की वापर ‘बऱ्यापैकी चांगला’ आहे. त्यांनी मजबूत UPI वापराचा उल्लेख केला पण शहरी सेवांवरील डेटाचा अभाव असल्याचेही सांगितले. त्यांनी केवळ सूचीबद्ध कंपन्यांच्या कमाईचा वापर मोजमाप म्हणून करण्याविरुद्ध इशारा दिला, कारण वापर सूचीबद्ध नसलेल्या लोकांकडे सरकत आहे. त्यांनी सांगितले की एकूण संसाधनांच्या जमवाजमवात कोणतीही कमतरता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *