पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच भव्य महारुद्राभिषेक सोहळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट ।। श्रावणातील शेवटच्या सोमवारी शहरात प्रथमच भव्य महारुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन होत आहे. विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने श्री नागेश्वर शिव मंदिर, एस. के. एफ. कॉलनी चिंचवड येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

काशी येथील विद्वान पंडितांच्या पोरोहित्याखाली हिमालयातील 1001 औषधी वनस्पतींचा वापर करून हा दुर्मिळ व पवित्र महारुद्राभिषेक दुपारी 12 ते ६ या वेळेत पार पडेल. यानंतर सायंकाळी ६ वाजता महाआरती व 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

“या दिव्य धार्मिक सोहळ्याचा लाभ पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा,” असे आवाहन नामदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.

या धार्मिक सोहळ्यामुळे श्रावणाचा उत्सव भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

 

 

 

 

ऑस्ट्रेलियाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या महान खेळाडूचे निधन

क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे महान खेळाडू बॉब सिम्पसन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निवृत्तीनंतर वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते, ऑस्ट्रेलियाचा संघ तेव्हा इतका काही मजबूत नव्हता. त्या काळात वर्ल्ड सीरीज क्रिकेटमध्ये संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळली होती. क्रिकेट त्यांच्या रक्तामध्येच होतं, त्यांनी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली, त्यानंतर राष्ट्रीय निवडकर्ते म्हणून काम पाहिलं होतं. सिम्पसन यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

१९६८ मध्ये बॉब सिम्पसन यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र १९७७ मध्ये ४१ व्य वर्षी ते पुन्हा मैदानात उतरले, सिम्पसन यांनी १९६४ मध्ये आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले होते, त्यावेळी तब्बल १३ तास त्यांनी बॅटींग करत पहिले त्रिशतक ठोकले होते. कसोटी कर्णधार म्हणून पहिले त्रिशत ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. कमी वयात कसोटी कर्णधार असण्याचा विक्रम जवळपास ६१ वर्षे त्यांच्या नावावर होता. मात्र २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या मुल्डर याने झिंब्बाव्बेविरूद्ध कर्णधार खेळताना त्रिशतक ठोकत मोडला होता.

बॉब सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियासाठी ६२ कसोटी २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ४८६९ धावा केल्या असून ७१ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. सिम्पसन यांच्या नेतृत्त्वात ३९ कसोटी सामन्यांपैकी १२ सामन्यांमधये त्यांनी विजय मिळवला होता. सिम्पसन यांचे भारतासोबतही खास कनेक्शन आहे. सिम्पसन यांनी १९९० मध्ये भारतीय संघाचे सल्लागार म्हणून काम पाहिलं आहे. तर २००० दशकामध्ये त्यांनी रणजीमधील राजस्थान क्रिकेट संघासाठी सल्लागार म्हणून भूमिका निभावली. क्रिकेट वर्तुळात ऑस्ट्रेलियाच्या लढवय्या कॅप्टनच्या जाण्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *