डोनाल्ड ट्रम्प करणार ‘या’ देशाचे तुकडे, जोरदार धक्का, कुटनीती सुरूच..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑगस्ट ।। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या भेटीनंतर आज डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांची भेट घेणार आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत ही भेट आहे. रशियासोबत लढण्यासाठी अमेरिकेने युक्रेनची मदत केली हे जगजाहीर आहे. मात्र, यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आणि त्याचा वाईट परिणाम हा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. युक्रेन आणि रशियामध्ये मध्यस्थी करत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगितले जातंय. मात्र, हे युद्ध थांबवण्याच्या बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युक्रेनचे तुकडे केले जाणार आहेत. काही अट वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यापुढे ठेवल्या जातील आणि त्यानंतरच हे युद्ध संपेल.

जर हे युद्ध युक्रेनला संपवायचे असेल तर त्यांना क्रिमियासह दोन मोठी शहरे रशियाला देण्याचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. फक्त हेच नाही तर नाटोमध्ये सहभागी देखील त्यांना होता येणार नाही. जर युक्रेनने डोनाल्ड ट्रम्प यांची अट मान्य केली तर त्यांच्या देशाचा मोठा भाग हा रशियाकडे जाईल. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी वोलोदिमीर जेलेंस्की हे मान्य करतात का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण मागच्यावेळी वोलोदिमीर जेलेंस्की यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चांगलीच वादावादी झाली होती.

फक्त वादावादीच नाही तर वोलोदिमीर जेलेंस्की हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची मिटिंग अर्धवट सोडून आपल्या देशाकडे निघून गेले होते. आता परत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे निमंत्रण स्वीकारले आहे आणि ते भेट घेणार आहेत. मात्र, इतक्या वर्षांच्या युद्धानंतर युक्रेनच्या हाती काय पडले हा प्रश्न उपस्थित होता? कारण एक मोठा भाग त्यांच्या हातून जात आहे शिवाय दोन मोठी शहरे आणि नाटोचे सदस्य देखील त्यांना होता येणार नाहीये आणि यादरम्यान त्यांच्या देशाचे मोठे नुकसान झाले.

युद्धाच्या दरम्यान अमेरिकेने मोठी मदत युक्रेनला केली. मात्र, आता तिच अमेरिका युक्रेन आणि रशियातील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. वोलोदिमीर जेलेंस्की हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी मान्य करतात का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, आजच्या या बैठकीकडे जगाच्या नजरा लागल्या असल्याचे बघायला मिळत आहे. सध्याच्या घडामोडींना चांगलाच वेग आल्याचेही बघायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *