महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने १५ ऑगस्टपासून देशात खासगी वाहन धारकांसाठी वार्षिक ३ हजार रुपयांचा टोल पास आणला आहे. त्यामुळे वारंवार फास्टटॅग रिचार्ज करण्याचं टेन्शन मिटले आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी सरकारने दिलासा देत FASTag वार्षिक पास उपलब्ध करून दिला. हा पास देशातील एकूण ११४४ टोल नाक्यांवर लागू असेल.
या वार्षिक पासमुळे केवळ सामान्य माणसांच्या खिशातील पैसे वाचणार नाहीत तर आरामदायक आणि टेन्शन फ्री प्रवास होणार आहे. ही एक प्रीपेड सुविधा आहे. ज्यात तुम्हाला वार्षिक ३ हजार रूपये भरून पास दिला जाईल. या पासची वैधता १ वर्ष किंवा २०० वेळा टोलमधून प्रवास करण्याची राहील. हा पास केवळ खासगी वाहन धारकांसाठी आहे. राजमार्ग यात्रा किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो खरेदी करू शकता. पेमेंट केल्यानंतर २ तासांत तुमचा पास एक्टिव्ह होईल. NHAI ने हा पास लागू असणाऱ्या महामार्गांची यादी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. त्यात वेळोवेळी बदल किंवा नवीन टोल नाक्यांचा समावेश होऊ शकतो.
महाराष्ट्रातील कोणत्या टोल नाक्यांवर वार्षिक पास चालणार?
चारोटी टोल नाका – पालघर
खानीवाडे टोल नाका – पालघर
नांदगाव टोल नाका – अमरावती
मानसर टोल नाका – नागपूर
माथनी टोल नाका – नागपूर
कामटी कन्हान बायपास टोल – नागपूर
नागपूर बायपास – नागपूर
बोरखेडी टोल नाका – नागपूर
गोंदखैरी टोल नाका – नागपूर
चंपा टोल नाका – नागपूर
भागिमरी टोल नाका – नागपूर
हलदगाव टोल नाका – नागपूर
केलापूर टोल नाका – यवतमाळ
भांबराजा टोल नाका – यवतमाळ
सेंदूरवडा टोल नाका – भंडारा
शिरपूर टोल नाका – धुळे
सोनगीर टोल नाका – धुळे
लालिंग टोल नाका – धुळे
कारंजा टोल नाका – वर्धा
दरोडा टोल नाका – वर्धा
हसनापूर टोल नाका – वर्धा
उद्री टोल नाका – बुलढाणा
खार्बी टोल नाका – चंद्रपूर
हतनूर टोल नाका – छत्रपती संभाजीनगर
करोडी टोल नाका – छत्रपती संभाजीनगर
तासवडे टोल नाका – सातारा
आनेवाडी टोल नाका – सातारा
किणी टोल नाका – कोल्हापूर
सावळेश्वर टोल नाका – सोलापूर
वरवडे टोल नाका – सोलापूर
वालसंग टोल नाका – सोलापूर
पाटस टोल नाका – पुणे
सरडेवाडी टोल नाका – पुणे
खेड शिवापूर टोल नाका – पुणे
चांदवड टोल नाका – नाशिक
घोटी टोल नाका – नाशिक
नाशिक सिन्नर टोल नाका – नाशिक
बसवंत टोल नाका – नाशिक
अर्जुनला टोल नाका – ठाणे
तमालवाडी टोल नाका – धाराशिव
येडशी टोल नाका – धाराशिव
पारगाव टोल नाका – धाराशिव
फुलेवाडी टोल नाका – धाराशिव
तलमोड टोल नाका – धाराशिव
पडळशिंगी टोल नाका – बीड
सेलूआंबा टोल नाका – बीड
माळीवाडी टोल नाका – जालना
धोकी टोल नाका – अहिल्यानगर
धुंबरवाडी टोल नाका – अहिल्यानगर
बडेवाडी – अहिल्यानगर
अशिव टोल नाका – लातूर
नशिराबाद – जळगाव
ओसरगाव – सिंधुदुर्ग
नंदानी – सोलापूर-विजापूर
चाचाडगाव – नाशिक-पेठ
अनकधाळ – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
इचगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-३)
पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
डोंगराळे – कुसुंबा ते मालेगाव
पेनूर – मोहोळ-वाखरी आणि वाखरी-खुडूस
पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
उंडेवाडी – पाटस-बारामती
बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
निमगाव खालू – अहमदनगर-किनेटिक चौक ते वाशुंडे फाटा
पंडणे – सरद-वाणी पिंपळगाव
बावडा – इंदापूर-बोंडाळे (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग)
भवानीनगर – खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद
करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
निंभी – नांदगाव पेठ-मोरशी
नांदगाव पेठ – तळेगाव-अमरावती
कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
तरोडा कसबा – अमरावती-चिखली (पॅकेज-३)
तुप्तकळी – आरणी-नायगाव बांधी
मेडशी-सावरखेडा – अकोला-मेडशी (पॅकेज-१)
धुम्का-तोंडगाव – मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)
अष्टा – औसा ते चाकूर
मालेगाव – चाकूर ते लोहा
परडी माक्ता – लोहा ते वारंगफटा
बिजोरा – वारंगा ते महागाव
खडका – रिंग रोड नागपूर पॅकेज – १
नंदुवाफा – सीजी/एमएच बॉर्डर टू वैनगंगा ब्रीज
पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
माळीवाडी-भोकरवाडी – येडशी छत्रपती संभाजीनगर
नायगाव – मंठा-पातुर
हिरापूर – गडचिरोली-मूल
वडगाव – कळंब राळेगाव वडकी
उमरेड – कळंब राळेगाव वडकी