महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आज आपल्या सौंदर्याचे कौतुक होईल. जुनी भांडणे मिटतील. धडाडीवर संयम ठेवा. भौतिक सुखाचा आनंद घेता येईल. व्यापारात काही सुधारणा कराव्या लागतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
मानसिक संतुलन हरवू देऊ नका. पायाच्या दुखण्याकडे लक्ष द्या. काही किरकोळ समस्यांतून मार्ग निघेल. कार्यालयीन सदस्यांशी वादाची शक्यता. मित्रांशी चर्चेतून मार्ग निघेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
व्यक्तिमत्वाची छाप पडण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. संयमाने व धीराने निर्णय घ्यावा लागेल. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. वाहनाचे काम निघेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
नोकरी व व्यवसायात मोठी संधी चालून येईल. तुमच्या बाबतीत संशय निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. दिनक्रम व्यस्त राहील. मन विचलीत होऊ शकते. भौतिक सुखाची अनुभूति घ्याल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
नवीन प्रयोगाला यश मिळेल. मित्रांचा सल्ला ग्राह्य मानाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. गोड बोलून कामे साध्य कराल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कष्टाने मान मिळवाल. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. तुमचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. काही खर्च अचानक उद्भवतील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
बौद्धिक गुण वापरून कामे करावीत. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आजचा दिवस शुभ राहील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
विचारपूर्वक सल्ला द्या. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जुनी येणी असतील तर त्याचा पाठपुरावा करा. ऐनवेळी येणार्या समस्या सोडवता येतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
धार्मिक गोष्टीत स्वत:ला रमवाल. जोडीदाराकडून चांगला लाभ होईल. कार्य सिद्धीस साशंकता नको. आध्यात्मिक कामात रुचि वाढेल. मनापासून जबाबदार्या पार पाडाल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
मानसिक आरोग्य टिकवाल. नातेवाईकांशी चांगले धोरण ठेवाल. निर्णय क्षमतेत वाढ होईल. कौटुंबिक मतभेद दूर होतील. चिकाटी सोडून चालणार नाही.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
स्वत:बद्दलचा आत्मविश्वास भक्कम करा. आज प्रवास नको. सौम्य शब्दात आपले मत मांडा. जोडीदाराची प्रगती सुखावणारी असेल. व्यवहारी दृष्टिकोन बाळगावा.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
अकारण खर्चाची शक्यता. मुलांवरील खर्च वाढू शकतो. उगाचच मन खिन्न होण्याची शक्यता. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास महत्त्वाचा ठरेल. नोकरदार वर्गाच्या समस्या दूर होतील. .