महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढाईला अखेर यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत मसुदा वाचून दाखवला. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण जिंकलो असं जाहीर करत पुढील एका तासात जीआर काढावा, त्यानंतरच आंदोलन थांबवू असं जाहीर केलं. तसंच आज रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करु असंही सांगितलं ाहे.
कोणत्या मागण्या मान्य झाल्या? मनोज जरांगेंनी काय सांगितलं?
1) हैद्राबाद गॅजेट अंमलबजावणी विषय — हैद्राबाद गॅजेट अंमलबजावणी साठी मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देऊ, कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करू.
2) सातारा संस्थान गॅझेट — पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो..सातारा संस्थान गॅजेट अंमलबजावणी बाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेता येईल… 15 दिवसात तपासू अंमलबजावणी देऊ…( काही त्रुटी आहेत त्यामुळं थोडं वेळ लागतो )
3) महाराष्ट्रातील केसेस बाबत — त्यांनी गुन्हे मागे घेतले जे राहिले ते कोर्टात जाऊन मागे घेऊ. सप्टेंबर अखेर पर्यंत मागे घेऊ असा जीआर काढला.
4) मराठा आरक्षण आंदोलन बलिदान दिलेल्या लोकांना मदत आणि शासकीय नोकरी द्यावी — आंदोलक वारसांना आतापर्यंत 15 कोटी मदत केली आहे. उर्वरित कुटुंबयाना 1 आठवड्यात मदत मिळेल. नोकरीसाठी राज्य परिवहन मध्ये नोकरी मिळेल.. यात थोडं बदल करावा अशी आमची मागणी आहे. शिक्षणानुसार नोकरी द्या अशी आमची मागणी आहे. एमआयडीसी मध्ये मिळाले तर खूप उत्तम आहे
5) 58 लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायत ला लावा, व्हॅलीडीटी अडकल्या आहेत , त्याही द्या
विखेंनी सांगितलं की,, समितीने ठरवले आहे याबाबत माहिती घेऊन दाखले निकाली काढण्यास सांगतोय, जिल्ह्याला प्रत्येक सोमवारी याबाबत बैठक होईल. यापूर्वी जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हते आता मनुष्यबळ दिले आहेत त्याला गती येईल.
शिंदे समितीला ऑफिस द्या, वंशावळ समितीला मुदत वाढ द्या. नोंदी शोधायला अधिकार द्या, मोडी लिपीतील पुरावे घ्या अशी मागणी जरांगेंनी यावेळी केली. मराठा कुणबी एक आहे जीआर बाबत महिनाभराच्या वेळ मागितला, थोडं किचकट आहे म्हणतात. 2 महिने घ्या पण जीआर काढा
शिवराय म्हणायचे खाताना थोडं थोडं खा नाहीतर घशात अडकते. आपणही थोडं संयमाने घेऊ असं जरांगे म्हणाले.
विखे पाटलांनी यावेळी, आम्ही मागण्या मान्य करतोय असं सांगितलं. त्यावर आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका, हे जीआर काढा आणि तो टिकवा असं जरांगे म्हणाले.
पोलिसांनी जो दंड लावलाय , तो मागे घ्या अशी मागणी जरांगे यांनी केल्यानंतर सगळे मागे घेतो असं उदय सामंत म्हणाले. रात्री 9 पर्यंत आम्ही मुंबई रिकामी करतो. जीआर द्या आनंदात परत जातो. आम्ही सरकारच्या स्वागताला सज्ज आहोत. जिंकलो आपण करा आनंद असं सांगितल्यानंतर आझाद मैदानात पाटील पाटीलचा जयघोष सुरु झाला.