महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आततायीपणा करून चालणार नाही. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपला साहसीपणा ताब्यात ठेवावा.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
कष्टाचा मोबदला मिळेल. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. अनुकूलतेचा सदुपयोग करावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. तुमच्याबाबतचे गैरसमज दूर होतील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
अंगीभूत कलेला वेळ द्यावा. स्व-कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. आळस झटकून टाका. आर्थिक मिळकतीत वाढ होईल. हातातील कामे पूर्णत्वास जातील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
प्रलंबित कामे मार्गी लागतील. अति गोड पदार्थ खाणे टाळा. धनसंचय वृद्धिंगत होईल. मित्रांची भेट मन प्रसन्न करून देईल. दिवसाचा पूर्वार्ध मजेत जाईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
जुनी देणी चुकवून टाका. शक्यतो वरिष्ठांना नाराज करू नका. व्यक्तिमत्वातून व बोलण्यातून चांगली छाप पाडा. नोकरदार वर्गाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता. समोरच्याला आपण होऊन मदत कराल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
बोलण्यातून कर्तृत्व सिद्ध कराल. मानसिक शांततेला अधिक महत्व द्याल. संशोधन वृत्ती डोके वर काढेल. आहारावर नियंत्रण ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
घरात शांत राहून सहकार्य करा. स्वप्नामध्ये अडकून पडू नका. पत्नीशी मतभेदाची शक्यता. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. ज्येष्ठांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
कोणावरही अवलंबून राहू नका. दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी सर्वार्थाने अनुकूलता लाभेल. विशाल दृष्टिकोन बाळगावा. जुन्या मित्रांची गाठ पडेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. जुने संशय मनातून काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा साधावा. जुगार खेळताना सावधानता बाळगा. कमिशन मधून लाभ होईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
स्पर्धात्मक गोष्टींची आवड निर्माण होईल. जोडीदाराची प्रेमळ सौख्य लाभेल. विरोधकांवर मात करता येईल. घरगुती ताण-तणाव दूर करता येतील. चहाडखोर व्यक्तीकडे दुर्लक्ष करावे.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
कोणावरही अति विश्वास ठेवू नका. कामात संभ्रम होऊ देऊ नका. बाहेरील कामे पुढे ढकलावीत. आहारावर नियंत्रण ठेवावे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
बोलताना चुकीचा शब्द बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. व्यायामाची आवड पूर्ण कराल. बर्याच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील.