महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ सप्टेंबर ।। गणेश विसर्जन सोहळ्याच्या दिवशी पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणे पोलिसांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीमध्ये झालेल्या बदलासंदर्भातील माहिती जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी कोणते रस्ते बंद राहणार आणि पर्यायी मार्ग कोणते ते देखील सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या शनिवारी होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त पुण्यातील बहुतांश सर्वच महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. अनंत चतुर्दशीच्या निमित्त पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यामुळे वाहन चालकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
येत्या शनिवारी सकाळी ९.३० वाजता पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होत असल्यामुळे मध्यवर्ती भागातील बहुतांश सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे. हे सर्व रस्ते किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत बंद राहणार आणि त्यासाठी पर्यायी मार्ग कोणते हे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचसोबत पार्किंगची व्यवस्था कुठे करण्यात आली आहे याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी पुण्यामध्ये प्रवास करताना पुणेकरांनी आधी बंद रस्त्यांची संपूर्ण यादी पाहून घराबाहेर पडावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
विसर्जन सोहळ्या दिवशी कुठले रस्ते राहणार बंद –
लक्ष्मी रोड: सकाळी ७ पासून मिरवणूक संपेपर्यंत
टिळक रोड: सकाळी ९ पासून मिरवणूक संपेपर्यंत
केळकर रोड: सकाळी १० पासून मिरवणूक संपेपर्यंत
कुमठेकर रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत
शिवाजी रोड: सकाळी ७ पासून मिरवणूक संपेपर्यंत
गणेश रोड: सकाळी १० पासून मिरवणूक संपेपर्यंत
बाजीराव रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत
शास्त्री रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत
जे एम रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत
कर्वे रोड: सायंकाळी ४ पासून पासून मिरवणूक संपेपर्यंत
फर्ग्युसन रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत
पुणे सातारा रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत
पुणे सोलापूर रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत
पुण्यातील या रस्त्यांवर असणार नो पार्किंग
लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक
केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
कुमठेकर रोड: शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक
टिळक रोड: जेधे चौक ते अलका टॉकीज चौक
शास्त्री रोड: सेनादत्त पोलिस चौकी ते अलका टॉकीज चौक
कर्वे रोड: नळ स्टॉप ते खंडोजी बाबा चौक