महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ सप्टेंबर ।। आज साम टीव्हीच्या मुख्य कार्यालयात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच त्यांनी या प्रसंगी संवादही साधला. बाप्पाच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह असतो. यंदाच्या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून सरकारने जाहीर केला आहे.
लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता कधी येणार असे विचारले असता तटकरे म्हणाल्या, लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे. लाडकी बहीण योजना ही कधीच खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच 2100 रुपये कधी करणार हा प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या, आमचे जे घोषणापत्र आहे ते पाच वर्षाचे आहे योग्यवेळी आम्ही नक्कीच 2100 रुपये देणार असे आदिती तटकरे म्हणाल्या.