महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०५ सप्टेंबर | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिस्तप्रीय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू इथल्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये, बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती.
कुर्डू गावातील मुरुम उपसा करताना महिला पोलीस अपअधीक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांनी अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. त्यावेळी, अजित पवारांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्याला कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, अजित पवारांवर टीकेची झोड उठल्याने आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्यात उपमुख्यमंत्री असले तरी “फोनवरून कारवाई थांबवा, हा माझा आदेश आहे” असं सांगून चालत नाही, हे अजित दादांना आता कळलं असेल! कारण समोर होत्या IPS अंजना कृष्णा – केरळच्या त्रिवेंद्रममधल्या, पण आज सोलापुरात अवैध मुरूम उपसा थांबवताना ‘खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची बहीण’ ठरल्या.
कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरूम उत्खनन सुरू होतं. ग्रामस्थांनी फोन लावला, थेट पवारांना. तिकडून दादा कडक आवाजात – “डीसीएम अजित पवार बोल रहा हूं… कार्यवाही बंद करो… मेरा आदेश है…” असं म्हणाले.
पण समोरची होती अंजना कृष्णा! म्हणाल्या – “माझ्या फोना वर कॉल करा, मग बोलू.”
इतकं धाडस? दादांच्या अंगावर गार पाणीच पडलं. लगेच व्हिडिओ कॉल करून “इतनी डेरिंग है तुम्हारी… चेहरा पहचानोगी ना माझा?” असं दम दाखवला. पण तरीही कारवाई थांबवली नाही. उलट ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले.
📌 IPS अंजना कृष्णा कोण?
मूळ : केरळ, त्रिवेंद्रम
UPSC रँक : 355 (2023 बॅच)
सुरुवातीला त्रिवेंद्रममध्ये एसीपी, नंतर महाराष्ट्र कॅडर
सध्या सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
प्रॉबेशन काळात पंढरपूर SDPO म्हणून काम
कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळख
करमाळा परिसरात अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका
नुकतेच कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात केलेली कारवाई
अजित पवारांसोबतच्या फोनवरील संवादातही ठाम व निर्भीड भूमिका
👉 अवैध कामांवर कारवाई करताना वरिष्ठ मंत्र्यांच्या दबावालाही न जुमानणारी अंजना कृष्णा यांची भूमिका आता चर्चेचा विषय बनली आहे.