महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ सप्टेंबर | आशिया कप 2025 सुरु झाला आहे. यामधला भारत पाकिस्तानचा सामना खूप वेळापासून चर्चेत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये असं अनेकांचं मत आहे भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे. हा हाय-प्रोफाइल सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यासाठी चार विद्यार्थ्यांची एक वेगळंच काम केलं आहे.
चार विद्यार्थ्यांची जनहित याचिका
या सामन्याविरोधात चार लॉ विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली असून या गटाचे नेतृत्व उर्वशी जैन करत आहे. याचिकेमध्ये असा मुद्दा मांडण्यात आला आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर लगेच पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हे शहीद जवानांचा आणि नागरिकांचा अपमान ठरेल.
राष्ट्रहित वरचढ – असा युक्तिवाद
याचिकाकर्ते ऍड. स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांनी न्यायालयात सांगितले की, “क्रिकेट कधीही राष्ट्रहित, सैनिकांचे बलिदान आणि जनतेच्या सुरक्षेपेक्षा मोठे ठरू शकत नाही.” त्यांनी सुप्रीम कोर्टाने तातडीने या बाबतीत हस्तक्षेप करावा, तसेच भविष्यातील निर्णयांसाठी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 लागू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
संसदेतही गदारोळ
भारत-पाकिस्तान क्रिकेट हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एशिया कप 2025 च्या वेळापत्रकापूर्वीच या सामन्यावरून संसदेत वादविवाद झाले होते. मात्र, सरकारने अलीकडे स्पष्ट धोरण जाहीर केले आहे की टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही; पण बहुपक्षीय स्पर्धांमध्ये सामना होईल.