महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ सप्टेंबर | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील ऑगस्टचा हप्ता थोडा उशिरा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, काही महिलांच्या खात्यात पैसे जमादेखील झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली असून याबाबत स्वतः आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.
आदिती तटकरेंनी (Aditi Tatkare) काल ट्विट करत ऑगस्टचा हप्ता जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी एकूण ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर आता लाभार्थी महिलांना प्रत्येकी १५०० रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे चेक करा.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात.
तुम्ही ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अॅपवर जाऊन पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन बघा की तुम्हाला पैसे आलेत की नाही. याचसोबत तुम्हाला पैसे आलेत की नाही याचा मेसेज येईल. त्यावरुनदेखील तुमच्या लक्षात येईल, पैसे आलेत की नाही.
तुम्ही ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊनदेखील तुमचा बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत पासबुकवर एन्ट्री करुन घेऊ शकतात. यातदेखील शेवटच्या ट्रान्झॅक्शनची माहिती मिळेल. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले की नाही आणि खात्यात एकूण किती पैसे आहेत याची माहिती मिळेल.