महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ सप्टेंबर | व्हॉट्सअॅप म्हणजे आपला जीव की प्राण. कोट्यवधी लोकांना जोडून ठेवणारा प्लॅटफॉर्म. यामध्ये नेहमीच काही न काहीतर अपडेट येतच असते. ज्यामुळे आपला युजर एक्सपिरियंस सुधारत असतो.कायम काहीतर नवीन आणणारे मेटा यंदाही मागे पडले नाहीये. यावेळी मेटाने एकदम भन्नाट पण खूप फायदेशीर फीचर आले आहे. हे फीचर आहे “थ्रेडेड रिप्लाय”
आता तुम्ही म्हणाल हे नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे काम करतं? या फीचरच्या मदतीने युजर्सना ग्रुप चॅटमध्ये एक फीचर मिळाले आहे. या फीचरचे पूर्ण नाव आहे थ्रेडेड मेसेज रीप्लाय. व्हॉट्सअॅपच्या येणाऱ्या फीचर्सची माहिती देणाऱ्या एका वेबसाइटने या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे. हे ग्रुप चॅटमध्ये स्ट्रक्चर मेसेज दाखवेल. या वेबसाइटवरून एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये दाखवले गेले आहे की हे फीचर कसे काम करते. खरं तर अनेकदा ग्रुप चॅटिंग करताना बरेच मेसेज येतात, ज्यामध्ये महत्वाचे मेसेज वाचायचे राहून जातात.
या फीचरच्या मदतीने तुम्ही पाहू शकता तुमच्या मेसेजला कोणी रीप्लाय दिला असेल, तर त्यांनंतर रीप्लाय व्यू उघडेल. यामध्ये तुम्ही सर्व मेसेज क्रमाने पाहू शकाल. बऱ्याचदा व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटमध्ये अनेक लोक एकाच वेळेस मेसेज पाठवत असतात. अशावेळी काही महत्वाचे मेसेज चुकतात. कंपनीने थ्रेडेड मेसेज रीप्लाय फीचर बनवले आहे. पण हे फीचर सध्या चाचणीत आहे. काही बेटा युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध झाले आहे.
Wabetainfo च्या स्क्रीनशॉटवरून असे दिसून येते की जर कोणी ग्रुपमध्ये तुमच्या मेसेजला उत्तर दिले तर उत्तरांची संख्या दिसेल आणि तुम्ही त्यावर क्लिक करून थ्रेड उघडू शकता. व्हॉट्सअॅपच्या येणाऱ्या फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटने म्हंटले आहे की हे फीचर अँन्ड्रॉईड आणि ios दोन्हीसाठी उपलब्ध असेल. येत्या काही दिवसांतच हे फीचर सर्वांना त्यांच्या व्हॉट्सअॅपमध्ये दिसू लागेल