Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ सप्टेंबर | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत घोषणा केली आहे. आता महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. ई-केवायसीसाठीची प्रोसेस आता सुरु झाली आहे.

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य
लाडकी बहीण योजनेत दरवर्षी महिलांची ई-केवायसी (E KYC)केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता ही प्रोसेस सुरु करण्यात आली आहे.याबाबत आदिती तटकरेंनी एक्स प्लॅटफॉर्मवरुन माहिती दिली आहे.ई-केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची मुदतदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला दोन महिन्याच्या आत हे काम करायचे आहे.

आदिती तटकरेंची घोषणा (Aditi Tatkare Big Annoucement)
आदिती तटकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.

ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

ई केवायसी म्हणजे काय?
ई केवायसी म्हणजे Know Your Customer. याचाच अर्थ असा की तुमच्या लाभार्थ्यांची माहिती पुन्हा भरणे. पुन्हा एकदा तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. जेणेकरुन तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे समजेल. ही प्रोसेस ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्यादेखील हे काम करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *