दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतली, पाकिस्तान दौऱ्यासाठी संघात निवड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ सप्टेंबर | दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा मैदानात धुडगूस घालण्यासाठी सज्ज झाला आहे. 2023 साली झालेल्या वनडे वर्ल्डकपनंतर त्याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, आता त्याची पाकिस्तान दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघात निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर नामीबियाविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी-20 मालिकेसाठी सुद्धा त्याची संघात निवड करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज आणि यष्टिरक्षक क्विंटन डिकॉकने चाहत्यांना सुख:द धक्का दिला आहे. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने जगभरात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. IPL मध्ये सुद्धा त्याची चमकदार कामगिरी क्रीडा प्रेमींनी पाहिली आहे. अशातच आता 32 वर्षीय डिकॉक दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघात पुनरागम करणार आहे. त्यामुळे चाहत्यांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.

क्विंटन डिकॉकने दक्षिण आफ्रिकेकडून 155 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत. त्याने आपल्या निवृत्तीपूर्व कारकिर्दीमध्ये 21 शतके आणि 30 अर्धशतके ठोकली आहेत. तसेच त्याने 45.74 च्या सरासीने 6770 धावा केल्या आहेत. डिकॉकने कसोटी क्रिकेटमधून 2021 साली निवृत्ती घेतली आहे.

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
मॅथ्यू ब्रीट्झके (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रुविस, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डिकॉक, डोनोव्हन फरेरा, टोनी डी जोझी, ब्योर्न फोर्टुइन, जॉर्ज लिंडे, क्वेनन म्फाका, लुंगी एनगिडी, नकाबा पीटरसन, लुआन-ड्रे प्रिटोरियस, सिनेथेम्बा केशिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *