महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ सप्टेंबर | Stock Market fell amide H-1B visa fee shocker : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१बी (H-1B) व्हिसा शुल्क वाढवल्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज दिवसभराच्या सत्रात आयटी कंपन्यांच्या शेअर्सना याचा मोठा फटका बसला, ज्यामुळे बाजार देखील खाली गेल्याचे पाहायला मिळले. दिवसाच्या अखेरीस निफ्टी ५० हा १२५ अंकांनी म्हणजेच ०.४९ टक्क्यांनी घसरून २५,२०२ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ४६६ अंकांनी किंवा ०.५६ टक्क्यांनी घसरून ८२,१६० वर पोहचला.
निर्देशकांप्रमाणेच निफ्टी बँक १७४ अंकानी किंवा ०.४९ टक्क्यांनी घसरून ५५,२८५ वर स्थिरावला. स्मॉल आणि मिडकॅप शेअर्स देखील घसरले. बीएसई मिडकॅप हा ३६६ अंकांनी किंवा ०.७८ टक्क्यांनी घसरून ४६,५०१ वर स्थिरावला. तर दुसरीकडे बीएसई स्मॉलकॅप हा दिवसाच्या अखेरीस ३८८ अंक किंवा ०.७१ टक्क्यांनी वाढून ५४,२३३.६३ वर पोहोचला.
निर्देशकांचे बुधवारीचे सत्र हे सकारात्मक पातळीवर येऊन बंद झाले. हे सत्र सुरू असताना ट्रेडिंग होत असलेल्या एकूण ३,२०५ शेअर्स पैकी १,१८६ मध्ये वाढ झाली तर १,९२० मध्ये घसरण पाहायला मिळली आणि ९९ मध्ये कोणताही बदल झाला नाही. आज १०७ शेअर्सनी त्यांचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर ५३ शेअर्सनी त्यांची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली.
सर्वाधिक वाढ कोणत्या शेअर्समध्ये?
सोमवारच्या सत्रात निफ्टी ५० मध्ये अदाणी एंटरप्रायझेस हा सर्वाधिक वाढ झालेला शेअर ठरला. यामध्ये ३.९८ टक्के वाढीसह बंद झाला. त्यानंतर झोमॅटो(Eternal), बजाज फायनान्स, अदाणी पोर्ट्स अँड एसईझेड, आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचा क्रमांक होता.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
आजच्या व्यवहारामध्ये सर्वाधिक घसरण ही टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये ३ टक्क्यांची घसरण झाली. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, सिप्ला, विप्रो आणि इतर अनेक कंपन्यांचे शेअर्स देखील घसरले.