महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ सप्टेंबर | हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावर टाटा १८१८४ सुपरफास्ट ट्रेनच्या एका बोगीला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती होताच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. ही घटना जामतारा जिल्ह्यातील कालाझारिया रेल्वे ट्रॅकजवळ ही घटना घडलीय. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, डब्यातून अचानक धूर आणि ज्वाला येऊ लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीती पसरली. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारण्यास सुरुवात केली.
दरम्यान प्रसंगावधान राखत लोको पायलटने ताबडतोब ट्रेन थांबवली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. ट्रेन सुमारे ४५ मिनिटे थांबली, त्या दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राने आग शमवली.