Horoscope Today दि. २७ सप्टेंबर ; आज वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील……..……..; पहा बारा राशींचं भविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर |

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
संगत योग्य आहे काय ह्याचा विचार करा. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्‍याची गाठ पडेल. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. खर्चात वाढ होऊ शकते.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
जुने वाद संपुष्टात येतील. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पट‍वून द्या. दिवस आनंदात घालवाल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
व्यायामाला नव्याने सुरवात करा. उत्तम भाषाशैली वापराल. व्यवसायात एखादा प्रयोग कराल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बचतीच्या योजना आखाल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
अति हळवे होऊ नका. भौतिक सुखात वृद्धी होईल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
तुमची लोकप्रियता वाढेल. जुने छंद जोपासावेत. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
श्रमाला घाबरून चालणार नाही. उगाचच कच खाऊ नका. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
अनाठायी बडबड टाळावी. झोपेची तक्रार जाणवेल. आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
आरोग्यासाठी हितकारक अशा गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका. ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील. रूचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आपला लोकसंग्रह वाढीस लागेल. जवळचा प्रवास सुखकारक होईल. अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. इतरांना आनंदाने मदत कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
खोल विचार करण्याची तयारी ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
जोडीदाराची प्रगती दिसून येईल. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल. धार्मिक कामात रस घ्याल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. पथ्यपाणी चुकवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *