धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर | धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी शेतीत घुसल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. घरं-दारं, जनावरं वाहून गेली असून पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी पुन्हा वाढत असून कळंब तालुक्यातील संजीतपूर या ठिकाणी असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तसेच परिसरातील शेतामध्येही गुडघ्याएवढे पाणी साचले आहे.

हवामान खात्याच्या वतीनेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून धाराशिवला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *