Bandu Andekar: आंदेकर टोळीची प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली 20 कोटीची वसूली ? पोलिस तपासात काय समोर आलं ? गुन्हा दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ सप्टेंबर | पुण्यातील आंदेकर टोळीला मुळापासून संपवण्याचा प्रण आता पुणे पोलिसांनी घेतल्याचं दिसत आहे. त्यांच्या अनाधिकृत बांधकामांवर हतोडा चालवण्यात आला, अनेक बॅनर काढून टाकण्यात आले. यामध्ये वनराज आंदेकरच्या आठवणीत लावलेले बॅनर देखील होते. वनराज आंदेकरची गेल्या वर्षी टोळी युद्धात हत्या करण्यात आली होती. या हत्येत गणेश कोमकर मुख्य आरोपी होता. आंदेकर टोळीने त्याच्या मुलाला म्हणजे आयुष कोमकरला संपवून बदला घेतला. त्यामुळे हे प्रकरण पेटलं. पण आता पोलिस या टोळी युद्धाला लगाम लावताना दिसत आहेत.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक
टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरला आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक केली आहे. त्याच्यावर अनेक खटले दाखल आहेत. प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी मागितल्यामुळे त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० कोटी रुपयांची खंडणी
मासेविक्रेत्यांकडून २० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतीचे वातावरण
पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीवर फास आवळला आहे. पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासेविक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून तब्बल १२ वर्षे प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळल्याचा आरोप सूर्यकांत आंदेकरवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *