महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर | हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील ४ ते ५ दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यात वर्तविण्यात आली आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आली आहे.
तसेच शनिवार आणि रविवारी मुंबई आणि ठाणे परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
येलो अलर्ट :-
ठाणे, मुंबई ,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , पुणे, घाटमाथा, सातारा,कोल्हापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, पालघर, नाशिक आणि अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे