“भारताची ७ विमाने पाडली”, पुराव्यांशिवाय UNGA मध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ सप्टेंबर | पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत असा दावा केला की, मे महिन्यात भारतासोबत झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ७ भारतीय विमाने पाडली. पाकिस्तानने यापूर्वीही अनेकदा दावा केला आहे की, त्यांनी भारतीय हवाई दलाची विमाने पाडली आहेत, परंतु भारताने हे दावे प्रत्येक वेळी फेटाळून लावले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने आजपर्यंत या दाव्यांबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.

“या वर्षी मे महिन्यात, माझ्या देशाला पूर्वेकडील आघाडीवरून विनाकारण आक्रमणाचा सामना करावा लागला. याला आमचा प्रतिसाद स्वसंरक्षणाच्या अनुषंगाने होता. आम्ही त्यांना अपमानास्पदरीत्या माघारी पाठवले”, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या महासभेत बोलताना म्हणाले.

एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते.

तत्पूर्वी, शरीफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासह आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी प्रादेशिक सुरक्षा, दहशतवादविरोधी सहकार्य आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. ट्रम्प आणि शरीफ यांच्यातील ही पहिली औपचारिक द्विपक्षीय बैठक होती.पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, ही बैठक वॉशिंग्टन डीसीमधील ओव्हल ऑफिसमध्ये झाली, जिथे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *