महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ सप्टेंबर | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. १५ वर्षांच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीला त्याने निरोप दिला. दोन विश्वचषक विजयी संघांमध्ये त्याचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने मोठे योगदान दिले. भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटीमध्ये ख्रिसच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दखापतीमुळे तो अॅशेस दौऱ्यातून बाहेर पडला.
ख्रिस वोक्सच्या मुख्य वार्षिक कराराचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नूतनीकरण केले नाही. यामुळे त्याने २०२६ मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कारकीर्द सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेटमध्ये ख्रिस वोक्सचे मोठे योगदान आहे. इंग्लंडच्या संघाला दोन विश्वचषक जिंकण्यासाठी त्याने मदत केली आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. तो इंग्लंडच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होता.
Pleasure has been all mine. No regrets 🏴 pic.twitter.com/kzUKsnNehy
— Chris Woakes (@chriswoakes) September 29, 2025
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीदरम्यान ओव्हल कसोटीत ख्रिस वोक्सच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत त्याच्यासाठी दुर्दैवी ठरली. या दुखापतीमुले त्याला अॅशेस मालिकेतून बाहेर पडावे लागले. इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून तो अॅशेस मालिकेत खेळण्याची आशा करत होता. पण दुखापतीमुळे त्याच्या आशा धुळीस मिळाल्या.
ख्रिस वोक्सने इंग्लंडकडून ६२ कसोटी सामन्यांमध्ये १९२ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूला, वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १५५ सामन्यांत २०४ गडी बाद केले आहेत. २०१९ मध्ये इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली ५० षटकांचा विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघात तो एक महत्त्वाचा खेळाडू होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने नाव कमावले आहे. इंग्लंडमध्ये देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने २३.४७ च्या सरासरीने १४८ बळी घेतले आहेत.