महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
अति विचार करू नका. जुने आर्थिक मुद्दे मार्गी लागतील. स्थावर, शेती विषयक प्रश्न मार्गी लागतील. संध्याकाळ नंतर दिवस चांगला जाईल. कौटुंबिक सहयोग उत्तम लाभेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
मुलांच्या अपेक्षा पूर्ण होतील. उधारी वसूल होईल. नवीन योजनेकडे लक्ष लागून राहील. स्थान बदलाची योजना यशस्वी होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवा. मित्रांना मदत कराल. हातातील कलेला वाव द्यावा. आपल्या आवडीची कामे करायला मिळतील. व्यवसायासंबंधी काही नवीन योजना स्फुरतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
जुनी येणी वसूल होतील. बोलण्यातून लोकांना दुखवू नका. कामात मनापासून प्रयत्न करा. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. मित्रांचे उस्फूर्त सहकार्य लाभेल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
बोलण्यातून लोकांचा विश्वास संपादन कराल. कौटुंबिक कामे योग्य पद्धतीने कराल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. वरिष्ठ अधिकारी समस्या निर्माण करू शकतात.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
मित्रांवर पैसे खर्च कराल. इतरांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. व्यावहारिक सावधानता बाळगावी. घरात शुभ कार्याविषयी चर्चा कराल. दिवस उत्तम जाईल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
बोलण्यात कडवटपणा आणू नका. कामात स्त्रियांची मदत मिळेल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. कामात काहीसे परिवर्तन शक्य. कामाच्या ठिकाणी असणारे वाद संपुष्टात येतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
धार्मिक कामासाठी पैसे खर्च होतील. लोक आपला सल्ला मानतील. आजचा दिवस चांगला जाईल. स्पर्धेला सक्षमपणे सामोरे जा. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
अति बोलू नका. घरगुती कामात संपूर्ण दिवस जाईल. दैनंदिन कामातील बदल लाभदायक ठरेल. हातातील संधीचे सोने करावे. रागावर नियंत्रण ठेवावे.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
जुनी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. दिवस सामान्य राहील. गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुलांसंदर्भात काही निर्णय घ्याल. नियमांचे पालन करा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
इच्छित प्रश्नाचे उत्तर मिळेल. मोसमी आजारांपासून काळजी घ्यावी. कुटुंबासमवेत वेळ घालवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
घरात कलहाचे प्रसंग येऊ देऊ नका. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. प्रसंगांना संयमाने सामोरे जावे. अनाठायी खर्च संभवतात.