महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि आस्थपना २४ तास …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ ऑक्टोबर | महाराष्ट्र सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि स्थापनं २४ तास उघडी ठेवता येणार. व्यवसाय, अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला मिळणार चालना. महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्यातील सर्व दुकाने आता २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. मात्र काही दुकानांसाठी हा नियम लागू नसेल.

कोणते दुकाने राहतील बंद?
मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे २४ तास सुरू राहणार नाहीत. तर इतर सर्वआस्थापना ,खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू राहतील. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ हा अधिनियम सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा येतील नोकरीला राहणारे. कर्मचाऱ्यांच्या इतर सेवांतील नियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा बाबींकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रात हा नियम लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्‍यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २१(२) मध्ये “दिवस” अशी व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आलीय. अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येणार आहेत. मात्र तरीही प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून २४ तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *