‘शक्ती’चा महाराष्ट्राला धोका? पुढील 24 तासांत हवामानात नेमके कोणते बदल अपेक्षित?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ६ ऑक्टोबर | महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान पाहायला मिळत असून पुढच्या 24 तासांसाठी राज्याच्या कोणत्या भागांमध्ये पावसाच्या धर्तीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याबाबतची संक्षिप्त माहिती हवामान विभागाच्या मुंबई शाखेकडून देण्यात आली आहे.


ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. ज्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

कोकणापासून मराठवाड्यापर्यंत कसं असेल पर्जन्यमान?
कोकण विभागात येणाऱ्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरींची हजेरी असेल तर, मध्य महाराष्ट्रात जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार इथं वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल. पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली आणि सोलापुरातही पावसाच्या हलच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी होणार असली तरीही हलक्या तरी नाकारता येत नाहीत. तर, विदर्भात मात्र भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र पावसाचा जोर फारसा नसेल. सध्या राज्यात कधी पाऊस तर कधी ऊन असं वातावरण राहील तर, पावसानं उघडीप दिल्यानं काही भागांमध्ये तापमानात वाढ अपेक्षित आहे.

मुंबईत कसे असतील पावसाचे तालरंग?
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात होईल. काही भागांमध्ये पाऊस उघडीप देऊन सूर्यकिरणांची हजेरी असेल तर काही भागांमध्ये मात्र क्षणात काळेकुट्ट ढग दाटून येत पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे.

कुठवर पोहोचलं शक्ती चक्रीवादळ?
अखेरच्या निरीक्षणानुसार रविवारपर्यंत चक्रीवादळ पश्चिम-मध्य अरबी समुद्रात जाणार पुढे सरकून सोमवारी सकाळी पूर्व-ईशान्येस सरकत कमकुवत होत जाणार आहे. याचा थेट धोका महाराष्ट्राला नसला तरीही दरम्यानच्या काळात मासेमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या वादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नसला तरीही पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे ही बाब नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *