महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. ७ सप्टेंबर – हॉस्पिटल मध्ये डॉक्टर ,स्टॉफ यांची कोविड पेशंट सोबत असणारी वागणूक , आणि स्वतः घेतलेला अनुभवावरून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष अलोक गायकवाड यांनी थेट आयुक्तकडे तक्रार केली . पत्रातील मचकूर आहे असा .
अत्यंत खेदाणे आपणास सांगावे लागते कि , वाय सी एम हॉस्पिटल मध्ये आलेला अनुभव तुम्हाला नमूद करावा वाटतो कि आपण ज्यांना देवदूत हि पदवी दिली तेच देवदूत कोविड पेशंट सोबत अत्यंत हीन दर्जाने वागतात हे पाहून फार वाईट वाटले कारण कोरोना हा विषाणू गरीब श्रीमंत पाहत नाही पण आपले देवदूत त्याहूनही हीन दर्जाची वागणूक देतात आणि त्या वागणुकीमुळे पेशेंटचे मनोबळ खालावते आणि पेशंट दगावतो आणि तेच दगावलेलं शरीर कित्येक तास त्याच जागेवरती पडून असते . आजूबाजूला असलेले बाकीचे रुग्ण आणखी मानसिक तणावाखाली जगतात यावरती काहीतरी माणुसकीने विचार करावा जेणेकरून आपला शहराचा कोविड आकडा कमी होण्यास मदत होईल तसे आपण आपल्या देवदूतांना माणुसकी आणि सहानभूती याबद्दल कळकळीने सांगावे एवढीच आपणाकडून अपेक्षा आहे कळावे ,