ह्या आठवड्यात मिळणार कोरोनाची लस ‘स्पुतनिक व्ही’, रशियानं केलं जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मास्को – दि. ७ सप्टेंबर – जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातयच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 11 ऑगस्ट कोरोनाची लस सापडल्याचे जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. या लशीवरून अनेक वाद झाल्यानंतर, ही लस किती सक्षम आहे यावरून अनेक प्रश्न विचारले गेले. यासगळ्यात रशियाने मात्र या लशीच्या उत्पादनाला सुरुवात करत याच आठवड्यात ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे.

एका रशियन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यापासून कोरोनाची लस ‘स्पुतनिक व्ही’ (sputnik v) सामान्य नागरिकांना दिली जाईल. ही लस 11 ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लाँच केली होती.

रशियन वृत्तसंस्था TASSने रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या डेप्युटी संचालक डेनिस लोगुनोव्ह यांना सांगितले की रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर sputnik vलस व्यापक वापरासाठी दिली जाईल. आरोग्य मंत्रालय या लसीची चाचणी सुरू करणार असून आम्हाला लवकरच त्याची परवानगी मिळणार आहे. रिपोर्टनुसार, ते म्हणाले की सर्वसाधारण लोकांना लस देण्याची निश्चित प्रक्रिया आहे. लोकांपर्यंत लस देण्यासाठी 10 ते 13 सप्टेंबर परवानगी घ्यावी लागेल. यानंतर, ही लस जनतेला देण्यास करण्यास सुरवात होईल.

रशियाची sputnik v ही लस रशियन संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने मॉस्कोच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने अॅडेनोव्हायरस सोबत तयार केली आहे. यावर्षी जून-जुलैमध्ये या लसीच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यात 76 व्हॉलेंटिअर्स सहभागी झाले होते. निकालात 100 टक्के अॅंटिबॉडीज विकसित झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *