Cough Syrup Alert : पुण्यात ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपचे वितरण नाही; नागरिकांनी काळजी करू नये, एफडीए

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | मध्‍य प्रदेशमध्‍ये ज्‍या भेसळयुक्‍त ‘कोल्‍ड्रिफ’ कफ सिरपचे सेवन केल्‍यामुळे बालकांचा मृत्‍यू झाला त्‍या कफ सिरपचे वितरण पुण्‍यात झालेले नाही. त्‍यामुळे, नागरिकांनी याबाबत काळजी करण्‍याचे कारण नसून इतर सिरपच्‍या कंपन्‍यांचे नमुने खबरदारी म्‍हणून घेण्‍यात येत आहेत, अशी माहिती पुणे विभागाच्‍या अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए, औषध विभाग) दिली.

मध्‍य प्रदेशमध्‍ये भेसळयुक्‍त कफ सिरपच्‍या सेवनाने नऊहून अधिक बालकांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यांनी खोकल्‍यावरील जे कोल्‍ड्रिफ कफ सिरप घेतले त्‍यामध्‍ये ‘डायएथिलीन ग्लायकॉल’ (डीइजी) हे मानवी शरीरासाठी घातक असलेले रसायन आढळून आले आहे.

त्‍या धर्तीवर केंद्रीय औषध मानक व नियंत्रण खात्‍याने राज्‍यांना सतर्कतेच्‍या सूचना दिल्‍या आहेत. त्‍यानुसार राज्‍याच्‍या ‘एफडीए’ने सर्व जिल्ह्यांना खोकल्‍याच्‍या औषधांची तपासणी करण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत. त्‍यानुसार पुणे विभागातही नमुने काढण्‍याची प्रक्रिया सूरू झाली आहे.

याबाबत माहिती देताना ‘एफडीए’च्‍या पुणे विभागाचे सहआयुक्‍त गिरीश हुकरे म्‍हणाले, ‘‘मध्‍य प्रदेशातील संबंधित खोकल्‍याच्‍या औषधांची विक्री पुण्‍यात झालेली नाही. मात्र, खबरदारी म्‍हणून राज्‍याच्‍या निर्देशानुसार जेथे खोकल्‍याचे औषधे तयार होतात त्‍या कंपन्‍यांमधील व सरकारी दवाखान्‍यातील औषधांची तपासणी करण्‍यासाठी नमुने गोळा करण्‍याची प्रक्रिया सुरू आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *