Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच हफ्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी वळता करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. महिला-बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलासांठी वापरण्यात यावा, अशी सूचना केली आहे.

सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता करण्याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ३९६० कोटी इतका नियतव्यय मंजूर केला आहे. त्यानंतर वित्त विभागाने सप्टेंबर महिन्यातील पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना हप्त्याचे पैसे देण्यासाठी एक पत्र काही दिवसांपूर्वी पाठवत निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सहाय्यक अनुदानामधील ४१०.३० कोटी रुपयांचा निधी देण्यास महिला व बालविकास कल्याण विभागाला वित्त विभागाने मंजुरी दिली.

सामाजिक न्याय विभागाने निधी मंजूर करताना महिला व बालविकास विभागाला महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. या सूचनेनुसार अनुसूचित जातीच्या आणइ नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसंच उपलब्ध करून दिलेल्या निधीचा वापर हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी होईल याची दक्षता घ्यावी. विभागाअंतर्गत संजय गांधी निराधर योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हत्पा मिळणार नाही हे देखील लक्षाच घ्यावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *