महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर | या वर्षी दिवाळीच्या काळात देशात उत्सवी पर्यटनात विक्रमी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतीय लोक आता पारंपरिक सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड घालत आहेत. त्यामुळे बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.
अनेक लोक दिवाळीसाठी आपल्या गावी परतत आहेत. तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे लोक कुटुंबीयांसोबत एकत्र येण्यासोबत अध्यात्मालाही सुट्ट्यांशी जोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्षातून एकदा कुठेतरी बाहेर जाण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय समाजात रुजताना दिसत आहे.
युरोप, आशियाला पसंती
मागो यांनी म्हटले की, भारतीयांचा आंतरराष्ट्रीय प्रवासही वाढला असल्याचे दिसून येत आहे. यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर यूएई, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम ही भारतीय लोकांची प्रमुख पसंतीची ठिकाणे ठरली आहेत. स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटाली आणि मालदीव यांसारख्या परदेशी ठिकाणांनाही मोठी मागणी आहे.
देशांतर्गत प्रवासात या स्थळांना प्राधान्य
देशांतर्गत प्रवासात केरळ, राजस्थान, उत्तराखंड, अंदमान तसेच अयोध्या, वाराणसी, चारधाम आणि कैलास मानसरोवर ही धार्मिक स्थळे विशेष लोकप्रिय ठरत आहेत.
१२ दिवसांपर्यंत दीर्घ सुट्ट्या घेण्याकडे कल
‘थॉमस कुक (इंडिया)’चे अध्यक्ष राजीव काळे म्हणाले की, अनेक पिढ्यांचा समावेश असलेली कुटुंबे एकत्र
प्रवास करून सण साजरा करण्याकडे वळत आहेत.
तीन दिवसांच्या पारंपरिक सुट्ट्यांऐवजी आता सहा ते बारा दिवसांच्या दीर्घ सुट्ट्या घेतल्या जात आहेत.