बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर | गेल्या दीड दशकात बँकिंग सेवांमध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी बँकांनी जवळजवळ प्रत्येक सेवेवर शुल्क लादल्याने ग्राहकांना फटका बसत आहे. त्यातच आता बँका येत्या १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवून बँका ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे.

सरकारी व खासगी बँकांनी अनेक नवीन सेवा शुल्क जाहीर केले आहेत, जे येत्या काही दिवसांत लागू होतील. एसबीआयने क्रेडिट कार्डसाठी नवीन शुल्क अटी जाहीर केल्या आहेत. आता रिवॉर्ड पॉइंट्सने खरेदी केलेल्या उत्पादनांवर किंवा व्हाउचरवर ९९ रुपये शुल्क भरावे लागेल.

एसबीआयचे शुल्क?
वीज, फोन, गॅस इत्यादींसाठी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर १% शुल्क.
कॉलेज, शाळेची फी भरण्यासाठी थर्ड-पार्टी ॲप किंवा वेबसाइटद्वारे केलेल्या पेमेंटवर १% शुल्क आकारले जाईल. मात्र, हे शुल्क शाळा किंवा महाविद्यालयात थेट केलेल्या पेमेंटवर लागू होणार नाही. डिजिटल वॉलेटमध्ये १,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास १% शुल्क आकारणार.

रात्री व्यवहार केल्यास वाढीव शुल्क
एचडीएफसी बँक रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कॅश रिसायकलर मशीन्समध्ये जमा केलेल्या रोख रकमेवर सर्व खात्यांसाठी प्रति व्यवहार ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारेल. हे दर १ नोव्हेंबरपासून लागू होतील. यामुळे कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर बोजा पडण्याची शक्यता जास्त आहे.

कोणत्या सेवेसाठी किती शुल्क?
डुप्लिकेट पासबुक १०० रुपये,
एंट्रीसह डुप्लिकेट पासबुक ५० रुपये प्रति पेज
अतिरिक्त चेक पेमेंट थांबवणे २०० रुपये प्रति चेक
ग्राहकाच्या चुकीमुळे चेक परत येणे १५० रुपये
स्वाक्षरी सत्यापन १०० रुपये
संयुक्त बँक खात्यात स्वाक्षरी पडताळणी १५० रुपये
डिमांड ड्राफ्ट (५ ते १० हजार) ७५ रुपये
पोस्टल शुल्क ५० ते १०० रुपये
रोख रक्कम काढणे (५ वेळा नंतर) ७५ रु. प्रत्येकवेळी
खाते देखभाल शुल्क ५०० रुपये
एसएमएस अलर्ट १० ते ३५ रुपये प्रति तिमाही
मोबाईल नंबर, ईमेल आयडी बदलणे ५० रु.+ जीएसटी
डेबिट कार्ड देखभाल शुल्क २५० ते ८०० रुपये
डेबिट कार्ड री-पिन बदलणे २५ ते ५० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *