लाडक्या बहिणींनो E-KYC केलं की नाही?: स्टेप बाय स्टेप घरीच करा E-KYC

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ ऑक्टोबर | राज्यात सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालाय. दिवाळीआधीच सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं. सरकारने अलिकडेच प्रत्येक लाभार्थी महिलांना ई- केवायसी करणे बंधनकारक असल्याचं सांगितले. त्यामुळे ई- केवायसी करण्यासाठी बहिणींची सध्या लगबग सुरू आहे. पण ई – केवायसी नेमकी करायची कशी? जर आपल्या ई – केवायसी करताना अडचणीचा सामना करावा लागत असेल, तर या काही स्टेप्स फॉलो करून पाहा.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केलं आहे. जर आपण २ महिन्यांच्या आत ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर, दरमहा १५०० रूपयांची आर्थिक मदत बंद होऊ शकते. सध्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रूपयांची आर्थिक मदत योजनेद्वारे मिळते.

मात्र, सुरूवातीला काही बोगस लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला. यामुळे योजनेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी तसेच बनावट लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळू नये म्हणून ई- केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे.

राज्य सरकारने लवकरात लवकर ई- केवायसी करणे अनिवार्य असल्याचं सांगितलं. अलिकडेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर, अधिकृत पोर्टलची लिंक शेअर करून ई – केवायसी करण्याचे लाभार्थी महिलांना आवाहन केले आहे.

ई- केवायसी करण्याची प्रक्रिया

ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.

ई केवायसी बॅनरवर क्लिक करा.

आधार नंबर अन् कॅप्चा कोड टाका.

ओटीपीवर क्लिक करा.

आधारशी जोडलेल्या नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.

यशस्वी पडताळणीनंतर ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.

अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक?

आधार कार्ड.

लाभार्थी महिलेचा पासपोर्ट साईज फोटो.

रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र.

लग्न झाले असल्यास विवाहप्रमाणपत्र.

आधारशी संलग्न बँक खात्याचे डिटेल्स.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *