महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ ऑक्टोबर | पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सध्याचा स्टार फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या खेळामुळे नाही — तर त्याच्या DRS ड्रामामुळे!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत बाबर बाद ठरला, आणि नेहमीप्रमाणे लगेच DRS घेण्याचा निर्णय घेतला. पण रिप्लेमध्ये बॉल सरळ मिडल स्टम्पवर लागलेला दिसताच — कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या माजी क्रिकेटपटू रमीज राजांनी थेट ऑन-एअर खोचक टोला लगावला — “आता हा ड्रामा करणार!”
सामन्यादरम्यान रमीजचा हा डायलॉग लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. काहींनी बाबरवर टीका करत “DRSचा गैरवापर करू नकोस!” असं म्हटलं, तर काही फॅन्सनी रमीजलाच सुनावलं — “कॅमेरासमोर एवढं बोलायचं होतं का?”
पण खरं सांगायचं झालं तर, बाबर आझमचा हा DRS निर्णय म्हणजे चाहत्यांसाठी “नाटकाचा नवीन एपिसोड” ठरला आहे. पाकिस्तान संघाचा खेळ जाऊदे, पण बाबरचा DRS शो मात्र थांबायचं नाव घेत नाही!
रविवारपासून (१२ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना लाहोर येथे सुरू झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी पाकिस्तानकडून चौघांनी अर्धशतके केली.
मात्र या सामन्यातही पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. पण त्याने एक खास विक्रम केला. परंतु, असं असलं तरी तो फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेने घेतलेल्या डीआरएस रिव्ह्यूवेळी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमिज राजा यांनी ऑन एअर त्याच्यावर टीका करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
No respect for Babar Azam in Pakistan
When Babar Azam reviewed, Ramiz Raja said, “Ye out hoga, drama karega.”pic.twitter.com/HLKJnyV1he
— Shah (@Shahhoon1) October 12, 2025
पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करत असताना बाबर आझम ४८ व्या षटकात कर्णधार शान मसूद ७६ धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला. त्यावेळी इमाम-उल-हक फलंदाजी करत होता.
बाबर आझम नुकताच फलंदाजीला आलेला असताना ४९ व्या षटकात सेनुरन मुथूसामी पहिल्या चेंडू शानदार टाकला, ज्यावर बाबर आझमने बचावात्मक पवित्रा घेतला होता. त्यावर चेंडू त्याच्या बॅट जवळून मागे गेला आणि यष्टीरक्षकाने झेलला. त्यावर पंचांनीही त्याला बाद दिले, पण बाबार आझमने डीआरएस घेतला. त्यामध्ये त्याच्या बॅटला चेंडू लागला नसल्याचे दिसले. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.