आता 6G चा धमाका, सुसाट,बेफाम,अगदी काही सेंकदात सिनेमा डाऊनलोड होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ ऑक्टोबर | भारतात आता 5G नंतर 6G चा धमाका होणार आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) महत्त्वाची भूमिका असेल. इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये दूरसंचार सचिव नीरज मित्तलने 6G चे भविष्य हे पूर्णपणे एआयवर आधारीत असेल असे ते म्हणाले. त्यांच्यामते, 6G ची चाचणी दोन वर्षानंतर 2028 मध्ये सुरु होईल असे सांगितले. त्यांच्या मते, एआय तंत्रज्ञान अधिक प्रगत असेल. पण या सेवासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

AI च्या मदतीने 6G नेटवर्कचा स्पीड सर्वाधिक असेल. ही रेंज कमी जास्त होणार नाही. एकाच स्पीडने रेंज मिळेल. 6G नेटवर्कमध्ये एआय आधारीत एजेंटिक एआय तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्याचा थेट फायदा युझर्सला होणार आहे. कॉलची आवाज आणि त्याचा दर्जा चांगला असेल. तर इंटरनेटची गती इतकी असेल की मोठ्या जीबीच्या फाईल झटपट काही सेकंदात डाऊनलोड होतील. 100 Mbps पेक्षा अधिक वेग सुरुवातीला असेल. पण 2028 पर्यंत तंत्रज्ञानात मोठा बदल अपेक्षित आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक स्पीड असण्याची शक्यता आहे.

एआय भविष्यातील अनेक अडचणी चुटकीसरशी सोडवण्यासाठी उपयोगी ठरेल. तर त्याच्या दुरुपयोग होण्याची भीती पण असल्याचे ते म्हणाले. डीपफेक व्हिडिओ, हुबेहुब आवाज, ऑनलाईन फसवणूक या गोष्टी एआयच्या वापरातून होत असल्याने त्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. लवकरच यावर नियंत्रण ठेवले नाही तर हे तंत्रज्ञान मानवी जीवनात मोठ्या अडचणी उत्पन्न करतील असा दावा त्यांनी केला.

200 कोटींची फसवणूक थांबवली
इंटरनेट युगातील धोके ओळखून दूरसंचार विभागाने एआय आधारीत सुरक्षा टूल तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. ऑनलाईन फसवणूक आणि संशयित व्यवहारांची छाननी यामुळे होते. या टूलच्या मदतीने आतापर्यंत 200 कोटी रुपयांची फसवणूक थांबवण्यात आल्याचे ते म्हणाले. तर 48 लाखांहून अधिक बोगस व्यवहारांना थांबवण्यात आल्याचे ते म्हणाले. या तंत्रज्ञानाआधारे कोणता व्यवहार वैध आणि कोणता अवैध हे समोर येत असल्याचे सचिवांनी माहिती दिली. यामुळे युझर्सचे लाखो रुपये वाचवल्याचा दावा त्यांनी केला.

एआय आणि 6 जीमध्ये भारताची लवकरच भरारी
इंडिया एआय मिशनसाठी सरकारने 1.25 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. सुरक्षित एआय संशोधन आणि स्टार्टअप्सना याआधारे मजबूत करण्यात येणार आहे. भारत लवकरच एआय आणि 6जीमध्ये जागतिक पातळीवर मोठी भरारी घेणार असल्याचा दावा सचिव मित्तल यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *