महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ ऑक्टोबर | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे. मात्र, आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिना सुरु होऊन १५ दिवस झाले आहेत तरीही हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. दरम्यान, ऑक्टोबरचा हप्ता या दिवशी येऊ शकतो.
ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana October Month Installment)
लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता लवकरच दिला जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात. कदाचित दिवाळीच्या मूहूर्तावर महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. मात्र, अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र लवकरच आदिती तटकरे याबाबत घोषणा करतील.
या महिलांनाच मिळणार ऑक्टोबरचा हप्ता (Only These Women Will Get October Installment)
लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांची पडताळणी सुरु आहे. यातून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अजूनही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. या पडताळणीतून ज्या महिलांचे अर्ज बाद केले जातील त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता महिलांना केवायसी करणेदेखील अनिवार्य केले आहे. आता सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करावेच लागणार आहे.
केवायसी करण्याची शेवटची तारीख काय? (Ladki Bahin Yojana KYC Update)
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, केवायसी करण्याची संपूर्ण प्रोसेस आहे. केवायसी करताना अनेकांना अडचणी येत आहेत. आता महिला व बालविकास विभागाने यावर तोडगा काढला आहे. दरम्यान, केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी आहे. तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायची आहे. याचसोबत पूरग्रस्त भागातील महिलांना केवायसी करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.