महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ८ सप्टेंबर – पेट्रोलियम कंपन्यांकडून होत असलेल्या डिझेल दर कपातीला मंगळवारी ब्रेक लागला. कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले. सोमवारी कंपन्यांनी डिझेल दरात ११ पैशांची कपात केली होती.
आज मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.७३ रुपये आणि डिझेलचा भाव ७९.६९ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८२.०८ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.१६ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोल ८५.०४ रुपये असून डिझेल ७८.४८ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.५७ रुपये आहे. डिझेल ७६.६६ रुपये प्रती लीटर झाला आहे.