महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ ऑक्टोबर २०२५ | अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी मोठी बातमी ! H1B व्हिसा अर्जदारांसाठी लागू केलेले तब्बल १ लाख डॉलरचे वाढीव शुल्क काही प्रकरणांमध्ये लागू होणार नाही, अशी ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता देण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) यांनी सोमवारी नव्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली.
त्यात म्हटले आहे की —
२१ सप्टेंबर रोजी दुपारी १२:०१ वाजण्यापूर्वी दाखल केलेले H1B अर्ज किंवा अपील यांना हे वाढीव शुल्क भरावे लागणार नाही. तसेच ज्यांच्याकडे आधीच H1B व्हिसा आहे आणि जे अमेरिकेबाहेर प्रवासावर आहेत किंवा परत येत आहेत, त्यांनाही हे शुल्क लागू होणार नाही. मात्र, कोणाचाही “Change of Status” किंवा मुक्कामवाढ अर्ज फेटाळला गेल्यास, नव्याने अर्ज करताना हे वाढीव शुल्क भरावे लागणार आहे.
🏛️ चेंबर ऑफ कॉमर्सला अंशतः यश
कोलंबिया राज्यातील अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने १६ ऑक्टोबरला या शुल्कवाढीविरोधात सरकारविरुद्ध दावा दाखल केला होता.
याच दाव्यानंतर अवघ्या चार दिवसांत USCIS ने नियमांमध्ये स्पष्टता आणली — पण शुल्कवाढ रद्द केली नाही.
म्हणजेच — फटका टळला आहे, पण वाढ कायम आहे!
ट्रम्प प्रशासनाचे हे निर्णय अमेरिकेतील परदेशी कामगार धोरणातील पुढील दिशा ठरवतील, असे निरीक्षकांचे मत आहे.