✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ ऑक्टोबर २०२५ | अरे, “दिल्ली! दिल्ली!” असं म्हणत काही जण दरवेळी स्वप्नातच पळतात; पण देवेंद्र फडणवीस मात्र थेट सांगून गेले —“महाराष्ट्र हेच माझं रणांगण आहे, दिल्ली अजून दूर आहे!” मुंबईच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दिवाळीच्या पूर्वसंध्येला फडणवीस बोलले आणि राजकारणात फटाक्यांचा स्फोट झाला. ते म्हणाले —“२०२९ पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार! आघाडीत ना नवे भागीदार, ना जुने गळतीत. महाराष्ट्र स्थिर, सरकार ठाम, आणि नेतृत्व ठोस!”हे ऐकून विरोधकांचं बोलणंच बंद. कारण गेली काही वर्षं ‘फडणवीस जाणार दिल्लीला’ हा गप्पांचा विषय होता. पण आज त्यांनी स्पष्ट सांगितलं —“मी दिल्लीच्या मागे नाही, महाराष्ट्राच्या पुढे आहे!” 💥
विरोधकांवर हल्ला चढवत फडणवीस म्हणाले —
“मतदार याद्यांबद्दल बोंबलणाऱ्यांनी अजून ठोस पुरावा दिला नाही. त्यांचा उद्देश फक्त निवडणुका पुढे ढकलण्याचा आहे!”तसेच, ठाकरे बंधूंबाबत त्यांनी सांगितलं —“राज आणि उद्धव एकत्र येत असतील तर ते महाराष्ट्रासाठी चांगलं. पण ‘ठाकरे ब्रँड’ हा फक्त बाळासाहेबांचाच! दुसरा कोणी नाही, होऊही शकत नाही!”सत्ता, स्थैर्य आणि सौहार्द यावर बोलताना फडणवीस म्हणाले —“मी आज ९९% नेत्यांशी सौहार्दात आहे. २०१९ नंतरचं वादळ थांबलंय, आता राज्यात राजकीय स्थैर्य आहे.”
आता सगळ्यात मोठा संकेत —
👉 मंत्रिमंडळाचं “कामगिरी मूल्यांकन” लवकरच होणार! म्हणजेच काही मंत्र्यांच्या खुर्च्यांखाली फटाके बसलेत की काय, अशी चर्चा सुरु! बिहार निवडणुकीवर बोलताना फडणवीस म्हणाले —“एनडीएसाठी वातावरण अनुकूल आहे. नितीश कुमारविरुद्ध नाराजी नाही.”
💬 थोडक्यात —
फडणवीसांच्या भाषणातली आत्मविश्वासाची तलवार पुन्हा एकदा झळकली! त्यांनी दिल्लीकडे पाठ, पण महाराष्ट्राच्या गादीवर हात घट्ट ठेवला. ज्यांचं राज्यावर प्रेम आहे, त्यांच्यासाठी हा संदेश —
👉 “मी इथेच आहे, आणि महाराष्ट्राचं नेतृत्व माझ्याच हातात राहणार!” 💪
