8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजुरी; शिपाई, क्लर्क ते अधिकाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ ऑक्टोबर २०२५ | मोदी सरकारने मंगळवारी मोठी घोषणा केली. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली आहे. याचसोबत आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे. आयोगाला पुढच्या १८ महिन्यात शिफारशी देण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, आता या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार आहे.

१८ महिन्यात मिळणार रिपोर्ट (8th Pay Commission Report)
आयोगाला १८ महिन्यात शिफारशी सादर कराव्या लागतील. त्यानंतर अंतरिम अहवाल सरकारला सादर करता येईल. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिफारसी ठरवताना आयोग देशाची आर्थिक परिस्थिती आणि सर्व गोष्टींचा विचार करेल. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो.

पेन्शनबाबतही निर्णय
कर्मचाऱ्यांना नॉन कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन योजनेच्या आर्थिक पैलूंवर शिफारसी करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. याशिवाय राज्याच्या आर्थिक परिस्थितीचेही मुल्यांकन केले जाईल. याच शिफारशींच्या आधारे कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे पगार वाढतात.

फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor Under 8th Pay Commission)
आठव्या वेतन आयोगाचा फायदा ५० लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि ६९ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. दरम्यान, पगारात कितीने वाढ होणार असा प्रश्न विचारला जात आहे. फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्यावर आधारित तुमचा पगार वाढणार आहे.

प्रत्येक वेतन आयोगानंतर महागाई भत्त्याचा दर शुन्यावर आणला जातो. त्यानंतर पुन्हा पहिल्यापासून महागाई भत्ता वाढला जातो.

पगार कितीने वाढणार? कॅल्क्युलेशन
जर तुम्ही लेव्हल ५ पदावर काम करत आहात. तुमचा पगार २९,२०० रुपये आहे. त्यावर ५५ टक्के महागाई भत्ता म्हणजे १६,०६० रुपये आहे. घरभाडे भत्ता ७,८८४ रुपये आहे. यामुळे तुम्हाला एकूण पगार ५३,१४४ मिळतो. दरम्यान, आता नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर पगार किती वाढणार जाणून घ्या.

बेसिक सॅलरी २९,२००x २= ५८,४०० रुपये

महागाई भत्ता= ०%

घरभाडे भत्ता= १५,७६८ रुपये

एकूण पगार= ७४,१६८ रुपये

कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार किती होणार?

जर फिटमेंट फॅक्टर २.८६ लागू झाला तर पगारवाढ

शिपाई किंवा अटेंडेंट- ५१,४८० रुपये

लोवर डिवीजन क्लर्क-३७,०१४ रुपये

कॉन्स्टेबल- २१,७०० रुपये

स्टेनोग्राफर किंवा ज्युनिअर क्लर्क-७१,९३० रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *