![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ ऑक्टोबर २०२५ | लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाभार्थी महिला विचारत आहेत. दरम्यान, आता ऑक्टोबरचा हप्ता येणार की नाही असाच प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्टोबर महिना संपायला फक्त दोन दिवस उरले आहे. अद्याप हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्याचसोबत ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर गेला तर तो न येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामागे काही कारणे आहेत. परंतु अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ऑक्टोबरचा हप्ता न येण्याची कारणे (Ladki Bahin Yojana October Installment Will Not Come)
पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. जर निवडणुका जाहीर झाल्या तर आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणताही निधी दिला जात नाही. सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत नागरिकांना पैसे दिले जात नाहीत. यामुळे या काळात कोणत्याही योजनेत पैसे मिळणार नाहीत. त्यामुळेच जर निवडणुका लागू होण्याआधी हप्ता दिला गेला नाही तर तो येणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल.
आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
निवडणुकांची तारीख अद्याप समोर आलेली नाही. ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतात. त्या दिवसापासून आचारसंहिता लागू होते. त्यामुळेच सरकारने त्याआधी पैसे दिले तर ते महिलांना मिळतील, अन्यथा लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
निवडणुकांमुळे केवायसीला स्थगिती (Ladki Bahin Yojana KYC Stopped)
पुढच्या काही महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. दरम्यान, निवडणुक झाल्यानंतर पुन्हा केवायसी सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे.
