Nagpur Farmers Protest : बच्चू कडूंच्या नेतृत्वात हजारो शेतकरी नागपूरच्या वेशीवर धडकले, महामार्ग ठप्प; आज ‘रेल्वे रोको’चा इशारा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ ऑक्टोबर २०२५ | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू, राजू शेट्टी आणि महादेव जानकर तसेच रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपूरच्या वेशीवर हजारो शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा धडकला आहे. आंदोलकांनी कालची रात्र जामठा येथे महामार्गावर काढली आहे.समृद्धी महामार्गासह जबलपूर,भंडारा आणि हैदराबादकडे जाणारे प्रमुख मार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरले आहेत.बच्चू कडू यांनी सरकारला आज दुपारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा रेल रोको करु असल्याचा इशारा दिला आहे.

मंगळवारी रात्री संपूर्ण नागपूर शहर शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वेढले गेले होते. हजारो शेतकऱ्यांची आणि आंदोलकांची गर्दी पाहून प्रशासनाला धडकी भरली. वर्धा रोडवर ३० किलोमीटर लांब वाहनांच्चा रांगा लागल्या. या मार्गाने शहरात येणाऱ्या पाणी, पेट्रोल टँकर आणि अन्नपदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला गेला नाही.

सामान्य नागरिक १२ तासांहून अधिक काळ रस्त्यावर अडकून पडले होते. दुपारपासून वर्धा रोड जवळजवळ बंद होता. रात्री उशिरापर्यंत तो तसाच होता. आंदोलकांनी रस्त्यावर तंबू लावले आहेत. या आंदोलनामुळे वर्धा रोडवरील अनेक पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ७ नंतर काही पेट्रोल पंपांनी पेट्रोल देण्यासही नकार दिला.

रात्री वर्धा जिल्ह्याच्या देवरी मतदार संघाचे भाजप आमदार राजू बकाने हे त्यांच्या वाहनात अडकले. आमदार बकाने हे त्यांच्या वाहनाला तिथेच सोडून सुरक्षारक्षकाच्या घेऱ्यात आंदोलनकर्त्यांपासून नजर चुकवून लपत जाण्याचा प्रयत्न करत असताना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले. बच्चू कडू सोबत आंदोलनस्थळी नेत बसविले. आमदार बकाने हे बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात आंदोलनस्थळी चार तास होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे हा मुद्दा मी अधिवेशानात लावून धरेल असे त्यांनी आश्वासन दिले.

दरम्यान, रात्री या आंदोलनादरम्यान रविकांत तुपकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, कापूस, सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. सरकारने ऐनवेळी चर्चेला बोलावले त्यामुळे तिथे पोहोचणे शक्य नव्हते असे तुपकर म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *