![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० ऑक्टोबर २०२५ | आजपर्यंत अज्ञात नंबरवरून फोन आल्यास तुमच्या मोबाईल स्क्रीनवर फक्त अंक दिसत होते. पण आता हे बदलणार आहे. दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना फसवणूक रोखण्यासाठी नंबरसह कॉल करणाऱ्याचे नाव दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. आता असे झाल्यास काय होऊ शकते? हे पाहुयात.
फोन वाजेल्यानंतर आता कॉलरचे नाव दिसणार. त्यामुळे ट्रू कॉलर सारख्यां इतर मोबाईल अॅपची गरज ग्राहकांना भासणार नाही. यामुळे डिजिटल आणि आर्थिक घोटाळ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे. कारण गंडा घालणाऱ्याचं बिंग आता लगेचच फुटणार आहे. मात्र याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना सध्या एका आठवड्यात एका भागात ही सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर दोन महिन्यांनी ही सेवा संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे.
मात्र यातून काही सरकारी संस्था आणि व्यावसायिकांना यातून सूट देण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी CLIR (Calling Line Identification Restriction) ची निवड केली आहे, त्यांचे नाव संरक्षित राहील. यात प्रामुख्याने गुप्तचर अधिकारी आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. ही सूट बल्क कनेक्शन, कॉल सेंटर्स किंवा टेली-मार्केटर्सना मिळणार नाही. याबाबत सायबर तज्ञांशी आम्ही बातचीत केलीय.. ते काय म्हणालेत पाहूया.
आपल्या सर्वांसाठी हा बदल स्वागतार्ह आहे. मात्र ही सेवा नेमकी केव्हापासून सुरू होणार आणि याचा गुन्हेगारी रोखण्यात कितपत फायदा होणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
