![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ नोव्हेंबर २०२५ | भारतीय रेल्वेमध्ये नवा अध्याय ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आता आणखी वाढणार आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) नव्या चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवास आरामदायी, सूकर आणि वेगवान होणार आहे. या चार वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. लवकरच या वंदे भारत एक्सप्रेसबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. या ४ वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर देशालीत एकूण वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या १६४ होणार आहे.
४ नव्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर कऱण्यात येणार आहे. रेल्वेकडून वंदे भारत एक्सप्रेसच्या लाँचिंगची तयारी करण्यात येत आहे. बेंगळुरू-एर्नाकुलम, फिरोजपूर कँट-दिल्ली, वाराणसी-खजुराहो आणि लखनौ-सहारनपूर या मार्गावर नव्या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा कर्नाटक, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे प्रवेसा कऱणाऱ्यांना जास्त होणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस?
बेंगळुरु-एर्नाकुलम
फिरोजपुर कँट-दिल्ली
वाराणसी-खजुराहो
लखनौ-सहारनपुर
वंदे भारत एक्स्पेसची लोकप्रियता देशात दिवसागणिक वाढतच आङे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची सरासरी ऑक्यूपेंसी 102.01 टक्के इतकी राहिली आहे. सुरू असलेल्या आर्थिक वर्षांपासून म्हणजेच २०२५-२६ मध्ये(जूनपर्यंतच) ऑक्यूपेंसी 105.03 पर्यंत पोहचली आहे.
वंदे भारतमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात ?
नवी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अनेक मॉडर्न सोयी-सुविधा मिळतात. कवच सुरक्षा प्रणाली, आरामदायी प्रवास, ऑटोमॅटिक डोर सिस्टम, अपंग प्रवाशांसाठी विशेष शौचालयाची सुविधा देण्यात येते. नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्याने प्रवाशांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळेल. त्याशिवाय भारतीय रेल्वेच्या आधुनिक तंत्रज्ञानावर जनतेचा विश्वास आणखी वाढेल.
वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये
कवच सिस्टममुळे सुरक्षित प्रवास
१८० किमी/ताशी वेग
१६० किमी/ताशी ऑपरेटिंग स्पीड.
जर्क-फ्री कपलर
स्वयंचलित प्लग दरवाजा
सर्व कोचमध्ये सीसीटीव्ही, आपत्कालीन अलार्म.
अग्निसुरक्षेसाठी एयरोसोल सिस्टम
अपंगांसाठी खास शौचालये
ड्रायव्हर-गार्ड कम्युनिकेशन आणि क्रॅश मेमरी
कोच मॉनिटरिंग सिस्टम.
