![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ नोव्हेंबर २०२५ | 🌊 वादळाचं केंद्र — बंगालचा उपसागर अंदमान-निकोबार बेटांच्या दिशेने घोंगावणारी ही प्रणाली ४ नोव्हेंबरपासून ‘चक्रीवादळात’ रूपांतरित होणार आहे. समुद्रात उठणारं हे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने येईल की नाही, हे सांगायला अजून वेळ आहे… पण त्याची सावली मात्र आधीच दिसू लागलीये!
🌧️ १५ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, पावसाची हजेरी
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा सज्ज!
आज मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली
या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी कोसळणार आहेत.
🌫️ तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण कायम
राज्यात ढगाळ आकाश, दमट हवा आणि गारठा —अशी ‘थोडी पावसाळी, थोडी हिवाळी’ अशी विचित्र जोडी जमलीये! कमाल-किमान तापमानात मोठे चढ-उतार होतील, तर काही भागांत विजांच्या चमकदार सरींचं पुनरागमन होईल.
⚠️ हवामान खात्याचा इशारा
हवामान खात्याने स्पष्ट सांगितलं —“समुद्र शांत दिसतोय, पण आतून वादळ उसळतंय!”अंदमान-निकोबारमध्ये अलर्ट वाजला आहे आणित्याचा प्रतिध्वनी महाराष्ट्राच्या आभाळात ऐकू येतोय! पुढील २४ ते ४८ तास हवामानासाठी निर्णायक ठरणार आहेत.
💬 👉
“वादळं ही फक्त समुद्रात नाही उठत…कधी कधी ती ढगात, हवेत आणि माणसांच्या मनातही उसळतात!” 🌩️
